अर्बन नक्सल दिमागी नक्षल : विश्वजीत सिंह
अर्बन नक्सल दिमागी नक्षल
ना हातात बंदूक,
ना जंगलात वास,
हा अर्बन नक्सल राहतो,
शहरात खास.
एसीच्या खोलीत,
कॉफीच्या कपात,
देश तोडण्याची स्वप्नं,
रंगवतो गप्पात.
कधी कवी होऊन,
कधी प्राध्यापक होऊन येतो,
हक्काच्या भाषेत, विष हळूच पेरतो.
शेतकऱ्याच्या नावावर,
आदिवासीच्या नावावर,
आपलीच पोळी भाजतो,
दिमागी नक्षल जगतो विदेशी पैशांवर.
जवान शहीद होतो,
तेव्हा हा गप्प बसतो,
अतिरेक्यासाठी मात्र,
मोर्चे काढत सुटतो.
हा म्हणतो मीच खरा,
बाकी सारे गुलाम,
आपल्याच देशविरोधात ,
हा करतो संग्राम
ओळखा या चेहऱ्याला,
हा गणवेशात नाही येत,
विचारांच्या आडून,
हा आडोसा घेत
लढाई आता बंदुकीची नाही,
ही विचारांची आहे,
सत्य आणि संविधानाने,
आपली भारतमाता वाचवायची आहे.
-- विश्वजीत सिंह
नागपुर
संपर्क:9028266021
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें