दलाल मीडिया प्रेस्टीट्यूट : विश्वजीत सिंह

 दलाल मीडिया प्रेस्टीट्यूट


कधी काळी पत्रकारिता,

 होती लोकशाहीचा चौथा खांब,

आता झालीय ती, 

पैशांची गुलाम.


कॅमेरा हातात, 

माईक तोंडाशी,

पण बातमी विकली जाते, 

नोटांच्या राशीशी.


सत्य दाबलं जातं, 

खोटं रंगवलं जातं,

जो जास्त पैसे देईल,

 त्याचंच गाणं गायलं जातं.


दलाली हीच आता,

 यांची पत्रकारिता,

टीआरपी साठी विकली, 

यांनी आपली आत्मा.


गरीबाचा आक्रोश, 

यांना दिसत नाही,

श्रीमंताच्या पार्टीत, 

यांची गर्दी असते.


प्रेस्टीट्यूट म्हणतात, 

लोकं आता यांना,

बातमी नाही, ही तर, 

जाहिरात झालीय यांना.


पण लक्षात ठेवा, 

सत्य कधी मरत नाही,

एक दिवस जनता, 

या दलालांना ओळखेलच.


-- विश्वजीत सिंह 

नागपुर 

संपर्क: 9028266021

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

Legal Positivism

Namo Namah Friends - be partners and join hands together