अद्वैत ज्ञानाचे तेज, भक्तीचा दिव्य साज : संत गुलाबराव महाराज

 

अद्वैत ज्ञानाचे तेज, भक्तीचा दिव्य साज : संत गुलाबराव महाराज


अंधारलेल्या जीवनाला, 

ज्ञानदीप दाखविणारे, 

विठ्ठलनामाच्या गजरात, 

ब्रह्मतत्त्व सांगणारे। 

अद्भुत होती प्रतिभा ज्यांची,

 प्रज्ञेचा महासागर,

 संत गुलाबराव महाराज, 

भक्तीचे दिव्य सागर॥


जन्माने आले अंधत्व, 

तरी अंतरी प्रकाश होता, 

डोळ्यांनी जग न पाहिले, 

पण आत्मज्ञानाचा ध्यास होता।

 वेदशास्त्रांच्या गाभाऱ्यात, 

चिंतन ज्यांचे रमले, 

ज्ञानदेवांच्या भक्तिपंथी, 

जीवन त्यांचे फुलले॥


नाही पाहिले बाह्य जग, 

तरी अंतरंग जाणले,

 ईश्वराच्या दिव्य स्वरूपाचे,

रहस्य त्यांनी उलगडले। 

ज्ञान आणि भक्ती यांचा, 

सुंदर संगम घडविला, 

अद्वैताच्या तत्त्वज्ञानाला, 

वारकरी भाव जोडिला॥


ज्ञानेश्वर माऊलींचे, 

होते ते अनन्य भक्त, 

विठ्ठलनामाच्या साधनेत, 

झाले सदैव अनुरक्त। 

भक्तीमध्ये ज्ञान असावे, 

ज्ञानामध्ये प्रेम असावे, 

जीवनाच्या प्रत्येक क्षणी, 

भगवंताचे स्मरण असावे॥


शास्त्रांचा सागर त्यांनी, 

लेखणीतून मांडला, 

असंख्य ग्रंथरचनांनी, 

अध्यात्ममार्ग उजळविला।

 स्त्रीशक्तीचा गौरव केला,

 भक्तीचा संदेश दिला, 

समाजाच्या कल्याणासाठी,

 विचारांचा दीप जळविला॥


नाही देहाचे सामर्थ्य, 

नाही नेत्रांचे वरदान, 

तरी प्रज्ञेच्या तेजापुढे, 

नतमस्तक झाले ज्ञान। 

जगाला शिकवून गेले, 

आत्मा कधी अंध नसतो, 

अंतरी विठ्ठल जागा असेल,

 तर अंधार उरत नसतो॥


चला वारकरी होऊ सारे, 

नामघोष करूया, 

माऊलींच्या चरणी जाऊन, 

भक्तिरसात न्हाऊया। 

गुलाबराव महाराजांचा, 

विचार हृदयी ठेवूया, 

ज्ञान, भक्ती आणि समतेचा, 

दीप घरोघरी लावूया॥



— कवी : विश्वजीत सिंह

नागपुर

संपर्क : 9028266021

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

Legal Positivism

Namo Namah Friends - be partners and join hands together