Social Icons

Friday, July 6, 2018

‘श्वास’ -

‘श्वास’
पुन्हा मी मोकळा श्वास घेतला!
माझ्यातला बंदी केलेल्या माणसाला मोकळ सोडून
पवनेच्या काठी बसल्यावर,
सुटीच्या दिवशी मी सकाळी पैरोल वर सोडतो त्याला व घेवून येतो इथे!!!

डोळ्यांना मागे सारून पापण्यांनी पडदे टाकत मन म्हटले!
कधी काळी ह्याच अवकाशात घेतला असेन तुकोबाने दीर्घ श्वास,
खूप सा-या घुसमटी नंतर डोळे मिटून म्हटले असेल, अणु रणीया थोकडा, तुका आकाशा एवढा !

एक दीर्घ श्वास घेत नाकारला असेन.....
भिक्षेतील गुळाचा खडा त्या छोट्या ज्ञानोबाने, संन्याश्यांच्या मुलांनी मेलच पाहिजे ऐकल्यावर!
केला असेन निर्धार, नाही मी मरणार नाही
विश्वधर्मासाठी विवेकाची मशाल चेतवत मी जिवंत राहीन त्या अजानवृक्षाखाली संजीवन समाधी मध्ये
आज ही तो श्वास चालू असेल माझ्या श्वासाबरोबर

असाच दीर्घ श्वास घेतला असेल त्या जिजाऊने कधीतरी सोन्याचा नांगर चालवितांना शहाजी राजांचा विरह सहन करून छोट्या शिवबाला वाढवतांना व तेवढाच दीर्घ श्वास घेतला असेन करारी डोळ्यातून शिवबाच्या हातावर दही कवडी ठेवताना, जेव्हा अफजल डे-यात घालत होता येरझारा अस्वस्थ श्वासांनी

अन असेच अनेक लहान मोठे श्वास अडकते असतील फासाच्या दोरात, गो-याला हया भूमीतून उपटून चेचून फेकण्याच्या प्रयत्नात.

मन भरा-या मारत होते, पण श्वास खरच अडकल्या सारखा वाटत होता!
यशाचे अनेक टप्पे गाठ्ण्यावेळी मी माझ्याच नाळ तोडल्या होत्या निर्दयतेने, माझ्या मातीकडे पाठ फिरवून.
अर्जुन बनण्याच्या प्रयत्नात निसर्गाचे श्रीकृष्णत्वं निसटले व चेहरा भासू लागला, फसलेल रथ काढण्याच्या प्रयत्नातील कर्णाचा

पवना हसली अन समाधी भंगली
म्हटली बाळl, कळतंय तुला, वळायच थोड बघ !
हा श्वास अडकण्याचा आजार दूर करता येईल का पहाव म्हणून हा प्रपंच दुसर काही नाही!
मला घाबरून एखाद्या श्वास तज्ञाकडे नेण्याची तूर्त गरज नाही!
हा एक करता येण्यासारखं आहे.
माझ्या मातीचा श्वास सारखा अडकू पाहतोय

काहीतरी विचित्र आजार झालाय म्हणता सारे, त्याच काही बघता आल तर पाहा!    - श्री दिनेश जोशी 

No comments:

Post a Comment

Popular Posts

‘श्वास’ -

6:39:00 PM Posted by Vishwajeet Singh

You can leave a response, or trackback from your own site.

0 Response to "‘श्वास’ - "

Post a Comment