संदेश

Nagpur लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

नागपूरचं भाऊ : सुनील किटकरू

चित्र
  नागपूरचं भाऊ ऊन लई भारी  फिकी पडे वाळवंटी सफारी l   माणूस वऱ्हाडी काय त्याचा रुबाब  रणरणत्या झळात बी चहाची वाफ   पुरणपोळी तूप त्याची न्याहारी   नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l देतो ताणून थंड कुलरच्या हवेत   आग ओकणाऱ्याला नाही भाव देत   वाघासारखी फिरण्याची हौस न्यारी  नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l सपन सरता ताटात दिसे खिचडी   भाजी वांग्याची अन मिरची बेगडी  दूध ताकांनी पळवतो उन्हाळी  नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l फिकी पडे वाळवंटी सफारी नागपूरच भाऊ ऊन लई भारी l जसा कोकणाला हापूस तारी  नागपूरची भाऊ संत्री लई भारी l              - सुनील किटकरु

नागपूर दंगल रिपोर्ट: भारतीय विचार मंच, नागपूर