नागपूरचं भाऊ : सुनील किटकरू
नागपूरचं भाऊ ऊन लई भारी फिकी पडे वाळवंटी सफारी l माणूस वऱ्हाडी काय त्याचा रुबाब रणरणत्या झळात बी चहाची वाफ पुरणपोळी तूप त्याची न्याहारी नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l देतो ताणून थंड कुलरच्या हवेत आग ओकणाऱ्याला नाही भाव देत वाघासारखी फिरण्याची हौस न्यारी नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l सपन सरता ताटात दिसे खिचडी भाजी वांग्याची अन मिरची बेगडी दूध ताकांनी पळवतो उन्हाळी नागपूरचं भाऊ ऊन लई भारी l फिकी पडे वाळवंटी सफारी नागपूरच भाऊ ऊन लई भारी l जसा कोकणाला हापूस तारी नागपूरची भाऊ संत्री लई भारी l - सुनील किटकरु